१०.परीक्षा फलाचे पृथक्करण |
१.प्राप्तांकाचा अर्थ लावण्याची पध्दती :
१.पालकांच्या मते संजयला गणितात ५२ गुण मराठीत ५६ व इंग्रजीत ४५ गुण पडले तेव्हा त्याने म्हटले की संजयला गणित व इंग्रजी पेक्षा मराठी चांगली मार्क पडले पण असे म्हणणे चुकीचे आहे पण पालकांच्या मते हा अर्थ योग्य आहे.
२.पण शिक्षकांने वर्गातील सर्व विद्यार्थांच्या गुणाचा विचार करून निष्कर्ष काढावा.
विषय : संजयचे गुण गणित ५२ ,मराठी ५६ ,इंग्रजी ४५. वर्गातील सर्वात जास्त गुण : गणित ६५,मराठी ६४,इंग्रजी ५०,वर्गातील सर्वात कमी गुण : गणित ४५ ,मराठी ४८ ,इंग्रजी ३६ . सरासरी गुण : गणित ५५ ,मराठी ५६ ,इंग्रजी ४३, शिक्षकांचा निष्कर्ष: गणित संजयला सरासरी पेक्षा कमी गुण आहेत, मराठीत संजयला सरासरी गुण आहेत, इंग्रजीत संजयला सरासरीपेक्षा जास्त गुण आहेत.
|
२.मापन पध्दती :
१.नामनिदर्शन श्रेणी : खेळाडूच्या पाठीवरील नंबर .
२.क्रमनिदर्शन श्रेणी : मापन पट्टीवरील १,२,३,मधील समांतर.
३.गुणोत्तर निदर्शन श्रेणी : २ गुण मिळालेल्या अर्चना पेक्षा ४ गुण मिळालेली मनिषा अधिक हुशार आहे हे चूक आहे.
|
३.पृथक्करण पध्दती :
१.गुणवत्ता क्रम पध्दती.
२.शत्तमक पध्दती .
३.शत्तमक क्रम .
४.इयत्ता प्रमाणके.
५.वयप्रमाणके .
गुणवत्ता क्रम पध्दती :
७६,७०,७०,७०,६५,५४,४५,४२,४२
२+३+४ /३ =३ यात ७० गुणांच्या ३ विद्यार्थांना
३ क्रमांक देणे.
८+९ /२ =८.५ यात ४२ गुणांच्या २ विद्यार्थांना ८.५ क्रमांक देणे.
गुणवत्ता क्रम : ७६=१,७०=३,७०=३,७०=३, ६५=५ ,५४=६,४५=७ ,४२=८.५,४२=८.५. |
४.शततमक व शततमक क्रम यातील फरक :
१.एखाद्या श्रेणीतील प्राप्तांक क्रमाने मांडून त्या श्रेणीचे १०० समान भाग केले तर प्रत्येक भागात येणाऱ्या बिंदुला शततमक म्हणतात. व शततमक क्रम दिलेल्या गुण वितरणामध्ये एका विशिष्ट गुणाखाली शेकडा किती गुण आहेत हे दर्शाविणाऱ्या आकड्यास शततमक क्रम म्हणतात उदा-पी ० =३० गुण पी १००=८० गुण .
२.शततमका मुळे एखाद्या श्रेणीतील एखादा बिंदू दर्शिविला जातो. व शततमक क्रम वरून त्या बिंदू खाली शेकडा किती गुण प्राप्त आहेत हे दर्शिवले जाते.
|
५.वयप्रमाणके व इयत्ता प्रमाणके यातील फरक :
१.निरनिराळ्या वयोगट नमुने घेऊन त्यांच्या क्षमतांचा विकास किती झाला हे पहिले जाते त्याला वयप्रमाणके म्हणतात व निरनिराळ्या इयत्तेतील विद्यार्थांचे नमुने घेतले जातात त्याला इयत्ता प्रमाणके म्हणतात.
२. वयप्रमाणके ज्या क्षमतांचा विकास वयानुसार होत नाही त्या क्षमतांच्या बाबतीत ही प्रमाणके उपयुक्त ठरत नाही व इयत्ता प्रमाणके कोणत्याही दोन लगतच्या वर्गामध्ये होणारी प्रगती समान असते असे नाही.
३. वयप्रमाणके फक्त १५-१६ वयोगट पर्यंत वापरता येतात व इयत्ता प्रमाणके सर्व इयत्तेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयापुरती मर्यादित असतात. |
६.परीक्षा फलकांचे पृथक्करण (विश्लेषण ) ची आवश्यकता /उपयुक्तता:
१.परीक्षा फलाचे पृथक्करण करतांना संदर्भ लक्षात घ्यावे लागतो.
२.विद्यार्थी विशिष्ट विषयात किती प्रगत व कच्चा आहे हे कळते.
३.अध्यापनातील त्रुटी समजून विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन करता येते.
४.विद्यार्थात अपेक्षित वर्तन बदल घडवून आला किंवा नाही हे कळते. |
७.परीक्षा फलकांचे सादरीकरण :
१.सोपी भाषा वापरून मुद्दे स्पष्ट करणे.
२.विद्यार्थांनी मिळालेल्या गुणांचे विश्लेषण.
३.परीक्षा संपल्यानंतर परीक्षा फलजाहीर करणे आवश्यक .
४.विद्यार्थांच्या विकासाचे चित्र स्पष्ट होते. |
रिरिडिंग |