५.मूल्यमापन | |
१.मूल्यमापन व मापन व मूल्यमापन यातील फरक : | |
२.मूल्यमापन प्रक्रियेचे सर्वसामान्य तत्वे : १.निश्चित उद्दिष्टे: उद्दिष्टे लक्षात घेऊन मूल्यमापन तंत्र वापरणे. २.साधनांच्या वापरासाठी विषयाची उद्दिष्टे निश्चित करणे. ३.साधनाचा उपयोग योग्य जागी करणे. ४.साधनाचा मर्यादा समजावून घेणे निष्कर्ष काढतांना चूका होऊ नये. ५.मूल्यमापन सतत चालणारी प्रक्रिया आहे.ते साध्य नव्हे एक साधन आहे. |
|
३.क्षमताधिष्ठित मूल्यमापन व ते करतांना शिक्षकाने लक्षात घ्यावयाच्या गोष्टी यासाठी शिक्षकाने खालील शैक्षणिक बाबीवर भर द्यावे. क्षमताधिष्ठीत मूल्यमापन : विद्यार्थांच्या क्षमता लक्षात घेऊन केलेले मूल्यमापन म्हणजे क्षमताधिष्ठीत मूल्यमापन . १.अभ्यासक्रम :शिक्षणातून उत्पादन क्षमता हे राष्ट्रीय उद्दिष्टे आहे. २.पाठ्यपुस्तक : पाठ्यपुस्तक = अभ्यासक्रम + उद्दिष्टे ३.अध्यापन पध्दती : शिक्षक व विद्यार्थांत आंतरक्रिया घडवून आणणे. ४.अध्ययन अनुभूती : विद्यार्थांचे वय,आवडी निवडी,अनुभव क्षमता. ५.मूल्यमापनाचे साधने: विद्यार्थांच्या प्रगतीचे मापन करण्यासाठी संख्यात्मक साधने तर विद्यार्थांचे आंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी गुणात्मक साधने. |
|
४.अध्यापनाची उद्दिष्टे : १.ज्ञान : विद्यार्थी स्मरण करतो,माहिती सांगतो,पाठकेलेले म्हणतो,वर्णन करतो. २.आकलन : तुलना करतो,फरक सांगतो,जोड्या जुळवतो,साम्यभेद मांडतो. ३.उपयोजन : गणितातील प्रमेय सोडवतो,उदाहरणे सोडवतो,पाठ्यपुस्तक वाचून स्वत:भाषेत लेखन करतो. ४.कौशल्य : नकाशा काढतो,नकाशा भरतो,आकृती काढतो,रचना करतो. ५.अभिरुची : आवडीने कृती करतो ,रमून जातो.संग्रह करतो.कविता व गोष्टी म्हणतो . ६.अभिवृत्ती : एखाद्या गोष्टीकडे विद्यार्थांचा ज्ञानात्मक ,भावात्मक ,क्रियात्मक दृष्टीकोन आहे. |
|
५.उद्दिष्टे ठरवितांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी : |
|
६.उद्दिष्टाचे स्पष्टीकरण लिहितांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी : |
|
७.अध्ययन अनुभव व अध्ययन प्रसंग यातील फरक : १.चेताकांशी होणाऱ्या प्रतिसादाला अध्ययन अनुभव म्हणतात. व अध्ययन अनुभव देण्यासाठी निर्माण केलेल्या वातावरणाला अध्ययन प्रसंग म्हणतात. २.अध्ययन अनुभवाने मेंदूवर काही संस्कार होतात. व अध्ययन प्रसंग हा मूर्त स्वरूपाचा असतो. ३.अध्ययन अनुभव म्हणजे अध्ययन प्रसंगातून साध्य होणारी गोष्ट आहे. व अध्ययन प्रसंग हे अध्ययन अनुभव देणारे साधन आहे. ४.अध्ययन अनुभवाचे प्रकार प्रत्यक्ष अनुभव व अप्रत्यक्ष अनुभव होय व अध्ययन प्रसंगाचे प्रकार अस्सल प्रसंग व अप्रत्यक्ष प्रसंग . |
|
८.अध्ययन अनुभवाचे प्रकार : १.प्रत्यक्ष अनुभव : विद्यार्थांना आकाशात प्रत्यक्ष तारा दाखवणे त्यास प्रत्यक्ष अनुभव म्हणतात. २.अप्रत्यक्ष अनुभव : विद्यार्थांना तारा आकाशात तारा न दाखवता त्याचे चित्र वर्गात दाखवणे त्यास अप्रत्यक्ष अनुभव म्हणतात. |
|
९.अध्ययन अनुभवाची निवड करतांना शिक्षकांने लक्षात घ्यावयाच्या गोष्टी : |
|
१०.अध्ययन अनुभवाचे केंद्र : १.शाळा : स्पर्धा,सहशालेय उपक्रम. २.घर: घरातील व्यक्तीचे वर्तन,संस्कार. ३.समाज : परिसर ,व्यक्ती-व्यक्तीतील आंतरक्रिया. ४.बहुमाध्यम : दूरचित्रवाणी ,आकाशवाणी. ५. मैदान : शारीरिक कौशल्य,खेळाडू. ६.मित्र: गटाचे नेतृत्व,सहकार्य. ७.सहली: निरीक्षण,निसर्गप्रेम, निसर्गसौदर्य. |
|
११.अध्यापनाचे उद्दिष्टे ,अध्ययन अनुभव व मूल्यमापनाची साधने यांचा त्रिकोण काढणे शिक्षण प्रक्रिया त्रिकोण : १.अध्यापनाची उद्दिष्टे : त्रिकोणाचा शिरोबिंदू २.अध्ययन अनुभव : उद्दिष्टे सध्या करण्याचे साधन . ३.मूल्यमापनाचे साधने : उद्दिष्टे कितीपत साध्य झाली यांची पाहणी करणे. |
|
१२.अध्ययन निष्पती व अध्ययन निष्पती ही तर विद्यार्थांच्या वर्तन बदलाचे चित्र आहे व विद्यार्थात घडून येणारे बदल: विद्यार्थात घडून येणारे बदल : |
|
रिरिडिंग |